Saturday , July 27 2024
Breaking News

आमदारांनी दांडी मारल्यामुळे बुडाची सभा लांबणीवर

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘बुडा‘च्या बैठकीला भाजप आमदारांच्या अनुपस्थितीचे ग्रहण लागले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली.
बेळगाव नगरविकास प्राधिकरणाची चौथी बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. गेल्या सलग दोन बैठकांना गैरहजर असलेले भाजप आ. अभय पाटील आणि अनिल बेनके या बैठकीलाही अनुपस्थित होते. मात्र काँग्रेस आ. सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी उपस्थित होते. बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी आणि भाजप आमदार अभय पाटील व अनिल बेनके यांच्यातील मतभेदांमुळेच दोन्ही आमदार अनुपस्थित राहिले असे समजते. त्यामुळे कोरमअभावी बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी 25 ऑक्टोबरपर्यंत बैठक लांबणीवर टाकली.
यासंदर्भात माहिती देताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बुडाची सभा झाली होती. त्यानंतर एकही सभा झालेली नाही. पुढील नियोजित सभेलाही जर भाजप आमदार अनुपस्थित राहिले तर अध्यक्ष कायदेशीर पाऊल उचलणार आहेत. कोरमअभावी आज सभा होऊ शकलेली नाही. कणबर्गी स्कीम नं. 61 अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे असे ते म्हणाले.
बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी म्हणाले, आमदारांना कळवूनच आम्ही सभा बोलावली होती. आमदार, सदस्य न आल्यामुळे सभा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आमचेच सरकार राज्यात सत्तेत असूनही आमचेच आमदार सभेला अनुपस्थित राहतात हे अयोग्य आहे. अशा वर्तनामुळे विकास कुंठित होतो अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. वास्तविक बुडाकडून लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम व्हावे अशी अपेक्षा असते. मात्र आमदारांच्या दांडी मारल्यामुळे बुडाच्या सभाच खंडित झाल्या आहेत. खोट्या प्रतिष्ठेसाठी लोकप्रतिनिधींनी अशी आडमुठी भूमिका घेणे कितपत रास्त आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *