Sunday , December 22 2024
Breaking News

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

Spread the love

बेळगाव : आजपासून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांना सुरुवात झाली असून यानिमित्ताने आज बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी आणि कन्नड शाळेमध्ये भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
नुकतेच सहावी ते दहावी पर्यंतच्या वर्गांना सुरुवात करण्यात आली होती. सध्या कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरविण्याचा आदेश जारी केला होता. याच पार्श्वभूमीवर आज बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी आणि कन्नड शाळेमध्ये भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
शाळेच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून रांगोळी आणि फुलांची आकर्षक सजावट केली होती.
यावेळी भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, 20 महिन्यानंतर इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरविण्याचे आदेश सरकारने दिले असून आज सर्व विद्यार्थी शाळेत आले आहेत. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज सर्व विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्याचे भाजप ग्रामीण मंडळाच्या वतीने ठरविण्यात आले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. बाळेकुंद्री बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने आज शाळेत स्वागत करण्यात येईल, याची मी कल्पनाही केली नव्हती. बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने आज राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल मी सर्व पदाधिकार्‍यांचे आभार मानतो.
यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मन्नोळकर, प्रधान सचिव पंकज घाडी, महिला मोर्सग अध्यक्ष भाग्यश्री कोकितकर, शैला जगदाळे यांच्यासह इतर मान्यवर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड

Spread the love  बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *