चंदगड तालुका हॉटेल कामगार व व्यावसायिकांकडून घेण्यात आली आढावा बैठक
पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना नुकताच घडली आहे. या निषेधार्थ चंदगड तालुक्यातील हॉटेल कामगार व व्यावसायिकांंकडून आढावा बैठक वारजे माळवाडी येथे घेण्यात आली.
यावेळी प्रभाकर कांबळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी व सदर गुन्ह्यात दोषी असणाऱ्या आरोपीवर कारवाई व्हावी या विषयाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सदर बैठकीमध्ये यूवावर्ग व हॉटेल कामगार, व्यावसायिक उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील एका हॉटेल कामगाराचा हाकनाक बळी जातो आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.