तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक आरोपी अॅड. राजकुमार राजहंसला घेऊन चंदगडमध्ये पोहोचले. या आरोपीला घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे.
चंदगडच्या ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्स बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाईंड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल लोहार आणि मुंबईतील महिला ड्रग्स पेडलर्स ख्रिस्थियाना यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या चंदगडमध्ये होणार्या दुसर्या फेरीच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणी सर्च ऑपरेशनची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. राजकुमार राजहंसला घेऊन मुंबई पोलिस पुन्हा एकदा चंदगड तालुक्यात हजर झाले आहे. मुंबई गुन्हे अन्वेशन विभागातील अंमली पदार्थ विरोधीपथक कारवाईसाठी आरोपी राजहंस व फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार यांना घेवून ढोलगरवाडी येेेथील फार्म हाऊसवर पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. यावेळी केअरटेकरच्या घरी देखील जावून पोलिसांनी पाहणी केलेली आहे. तसेच बेळगाव या ठिकाणी देखील तपासणी केली जाणार असल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा थेट संबंध चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी असल्याचे मागील तपासात स्पष्ट झाले होते. आरोपींना घेऊन या एमडी ड्रग्ज बनवण्यासंबंधी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे काम केले जाणार असल्याचे समजते आहे. यामध्ये आरोपींविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून केअरटेकर निखिल लोहार व राजकुमार राजहंस यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आता चंदगड तालुक्यातील इतर कोणत्या ठिकाणी या ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन आहे का? यापूर्वी बसर्गे हद्दीतील एका पोल्ट्री फार्मवर कारवाई करून सिल करण्यात आले होते. त्याचा या प्रकरणात काही संबंध आहे का? या सर्व बाबींसंदर्भात आरोपी यांना घेवून मुंबई पोलिसांकडून तालुक्यातील अन्य धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न असून परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही केस स्ट्रॉग केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात चंदगडमधील आणखी कोणाचा हात आहे का? याची चौकशीही हे पथक करणार आहे.
Check Also
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Spread the love विरार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा …