बेळगाव : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप चांगले क्रीडापटू तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर विजय मोरे यांनी केले.
हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा चषक अनावरण सोहळा शनिवारी एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, युवा कार्यकर्ते अमित देसाई, माजी क्रिकेटपटू डॉ. कुमुदा वेसणे, जगनाथ चव्हाण-पाटील, खासबाग सर्कल व्यापारी बंधू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा हलगेकर आदी उपस्थित होते.
शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी प्रास्तविक करताना हलशीवाडी येथे दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी दरवर्षी मदत करीत असून येणार्या काळात हे या भागात मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर आदी चषकाचे अनावरण करण्यात आले.
हलशीवाडी येथील स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरूवात होणार असून ही जिल्हा ग्रामीण भागासाठी मर्यादित असून स्पर्धेतील विजेत्या संघाला 41 हजार व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 25 हजार व आकर्षक चषक व इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
Check Also
राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत
Spread the love बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते …