बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि मद्रास रेजिमेंटच्या 263व्या स्थापना दिनानिमित्त काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे आज बेळगावात आगमन झाले.17 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल मंजींदर सिंग यांच्याहस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीचे नेतृत्व मेजर हरीश बोरा करत आहेत. या रॅलीचे शनिवारी बेळगावात आगमन झाले. पंतनगर येथे रॅलीचे शानदार स्वागत करण्यात आले. यावेळी बेळगावचे नोडल अधिकारी सन्नयल्लप्पा तळवार, कॅप्टन दि. बी. रजपूत, काडप्पा संसुद्दी, पंतनगरचे ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील माजी सैनिकांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी सियाचीनमध्ये वीरमरण प्राप्त झालेले वीरयोद्धा हनुमंतप्पा कोप्पद यांच्या धर्मपत्नीसह वीरपत्नी आणि वीरमातांचा गौरव करण्यात आला.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …