बेंगळुरू : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल)ने लिंगनमक्की धरणातून सुमारे 500 क्युसेक पाणी सोडले जेणेकरून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग फॉल्स धबधबा पाहता यावा. अधिकार्यांनी यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकार्यांनी हा प्रताप केला आहे.
कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल थावरचंद गहलोत हे शरावती नदीवर 151 टीएमसी क्षमतेचे मोठे धरण आहे. या धरणाच्या जवळपास प्रसिद्ध ‘जोग फॉल्स’ हा धबधबा आहे. हा धबधबा पाहायला राज्यपाल जाणार होते. राज्यपालांना धबधबा वेगाने वाहतांना पाहता यावा यासाठी अधिकार्यांनी मनमानी करत नदीकाठच्या लोकांना कुठलीही पूर्व कल्पना न देता राज्यपाल येण्यापूर्वी शरावती नदीमध्ये पाणी सोडले. मात्र, धबधब्यापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच राज्यपाल काही मनिटातच तेथून निघून गेले.
गुरुवारी केलाडी शिवप्पा नायक कृषी आणि फलोत्पादन विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी गहलोत शिवमोग्गा येथे गेले होते. जोग येथील इंस्पेक्शन बंगल्यात त्यांनी रात्रभर मुक्काम केला, ज्याला ब्रिटिश बंगला म्हटले जाते, जो फॉल्सच्या जवळ आहे. दरम्यान, योग्य प्रक्रिया न करता पाणी सोडल्याबद्दल अधिकार्यांची आता चौकशी करण्यात येत आहे. कारण अचानक पाणी सोडल्यामुळे नदीकाठी राहणारे लोक धोक्यात आले असते.
Check Also
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन
Spread the love बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) …