Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…

Spread the love

 

आयपीएलच्या धर्तीवर नियोजन …

बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली असून, बेळगांव जिल्ह्यासाठी आपली टीम तयार झाली असून बेळगांव जिल्ह्याच्या टीम चे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून या बेळगाव टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फांऊडेशनकडे असून या स्पर्धा १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात बेंगलोर येथे खेळवल्या जाणार आहेत.
यासंदर्भात “राजा शिवाजी बेळगाव” या टीमच्या लोगोचे अनावरण व या स्पर्धेच्या आयोजनाची माहिती आज बेळगांव येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आजच्या पत्रकार परिषदेस कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशचे अध्यक्ष श्री. गंगाधर राजू उपस्थित होते. तसेच डॉ. अंजलीताई फांऊडेशनचे सुरेश जाधव, मिलींद भाऊ तसेच बेनी पिंटो, नगरसेवक तोहीद चांदखन्नावर, संदीप देसाई तसेच क्रिकेट टीमचे सदस्य/ खेळाडू उपस्थित होते.
असोशिएशनचे अध्यक्ष श्री. गंगाधर राजू यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक खेळाडूस गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले…
गंगाधर राजू यांनी पत्रकारांना सर्व माहिती दिली की,
सर्वानाच राज्याच्या, देशाच्या क्रिकेट संघात किंवा आयपीएलमध्ये खेळायला मिळत नाही, गल्ली क्रिकेटमध्ये अनेक होतकरू खेळाडू आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याचे गंगाधर राजू म्हणाले. आयपीएलचा धर्तीवर सगळे नियोजन करण्यात आले असून खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुद्धा मागेच पार पडली असून खेळाडूंची निवड प्रक्रिया सुद्धा पार पडली असल्याचे पत्रकार परिषदेत आज सांगण्यात आले.
उपस्थित सर्वानी आपल्या जिल्ह्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *