बेळगाव : कायदे तज्ञ असीम सरोदे सोमवारी बेळगावला भेट देणार आहेत. सोमवार दि 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 5.30 वाजता सरोदे यांचे बेळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृह गिरीश कॉम्प्लेक्स बापट गल्ली कार पार्किंग येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी ते ‘बेळगाव मध्ये होणारी मानवाधिकारांची पायमल्ली’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तरी जास्तीत जास्त बेळगावकरानी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा आवाहन संयोजक – साम्यवादी परिवार आणि आम्ही बेळगावकर मराठी संघ यांनी केलं आहे.