बेळगाव : ठळकवाडी हायस्कूलमध्ये नोव्हेंबर महिन्यातील चौथा रविवार एनसीसी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, संविधान दिवस कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर.
कुडतुरकर, ज्येष्ठ शिक्षक विवेक पाटील, सुरेश भातकांडे, उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. आर. कुडतूरकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपले मनोगत व्यक्त करताना एनसीसीमुळे जीवनात होणारे फायदे आपण कसे अमलात आणले पाहिजेत तर, सुरेश भातकांडे सरांनी एन.सी.सी एक मोठी शाखा आहे. त्यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल होत असतात. सामाजिक कार्याबरोबरच एन.सी.सी मुळे आपले ध्येय व त्याचे उपयोग या विषयी मार्गदर्शन केले. ट्रप कमांडर एस.एन.गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व एन.सी.सी चे उद्देश आणि महत्त्व पटवून दिले. एन.सी.सी छात्र अक्षता वारंग, शब्दश्री शंकर गावडे, साक्षी पाटील, श्रीनिकेतन येडूर, प्रिया कोलेकर, गायत्री लोहार, सुनिता गोरल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बेळगाव शहरांमधील वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांची विचारपूस केली. या सर्व कार्यक्रमांसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी खूप प्रोत्साहन दिले. एन.सी.सी छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल शहापूरकर यांनी आभार मानले व एनसीसी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
