खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील व अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिगुळे येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.
चिगुळे मराठी शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालतात.
मात्र शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने केवळ तीनच वर्गात सर्व चालतात. इतर इमारत कोसळली आहे. काही खोलीचे छत उडाले आहे. याबाबत संबंधित खात्याला तसेच लोकप्रतिनिधी ना कळवून कोणीच लक्ष दिले नाही.
यावेळी बोलताना माजी सैनिक गणपत गावडे म्हणाले की, चिगुळे शाळेच्या इमारतीसारखीच तालुक्यातील अनेक शाळांची अवस्था बिकट झाली आहे.
एकीकडे लोकप्रतिनिधी तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावणार असे सांगत आहेत. मात्र तालुक्यातील शाळेच्या इमारतीची दुर्दशा का.? असा सवाल केला.
एकंदरीत तालुक्यातील शाळा इमारतीची अवस्था फारच हाल्याक्याची झाल्याने तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे.
