Sunday , September 8 2024
Breaking News

लखन जारकीहोळी निवडून येणारच!

Spread the love

युवा नेते उत्तम पाटील यांची स्पष्टोक्ती : लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ तवंदीत सभा
निपाणी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना हात जोडून चालत नाही. आपण कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याबरोबरच केवळ राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर न करता त्यांना बँक, सुतगिरणी, साखर कारखाना, गारमेंट सुरु करुन रोजगार मिळवून दिला जात आहे. हे सर्व करत असताना केवळ जारकीहोळी बंधुमुळे शक्य झाले आहे.
त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत लखन जारकीहोळी यांना निवडून दिल्यास निपाणी मतदारसंघात अधिक गतीने कामे होतील. यासाठी जारकीहोळी यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून द्यावे. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे आवाहन बोरगाव येथील युवानेते उत्तम पाटील यांनी केले.
विधानपरिषद निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ निपाणी मतदारसंघातील ग्रामपंचायत, नगरपालिका पदाधिकारी, सदस्य तसेच उत्तम पाटील प्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा तवंदी येथील ब्रह्मनाथ भवनात शुक्रवारी (ता. 3) पार पडला. यावेळी ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी केले. उत्तम पाटील पुढे म्हणाले, 2018साली विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघात जनतेने 78 हजारावर मतदान केले. दुर्दैवाने काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. यानंतर कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घ्यावा, अशी विनंती आपण केली. मात्र मेळावा घेण्यात आला नाही. गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली होती. स्थानिक पातळीवर अनेक मतभेद होते. ते सर्व दूर करत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. यापुढेही कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली
उमेदवार लखन जारकीहोळी म्हणाले, आपल्याला निवडणूक लढविण्यासाठी दोन्ही पक्षांकडून ऑफर होती. मात्र सर्वांनी सहकार्य करावे, यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहोत. लोकांना रोजगार देण्यासाठी जारकीहोळी बंधू व उत्तम पाटील एकत्र काम करत आहेत. निपाणी मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानपरिषद निवडणुकीत आपल्याला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अशोक कुमार असोदे, हालशुगरचे माजी उपाध्यक्ष राजू पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, जयवंत कांबळे, के. डी. पाटील, प्रा. सचिन खोत, इंद्रजीत सोळांकुरे, संजय कागे, अमित शिंदे, विनोद डेंगे यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी त्यांनी आपण ब्रह्मनाथ देवाचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे सांगत येथे धावती भेट देत लखन जारकीहोळी यांनाही निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, डॉ. जसराज गिरे, शेरू बडेघर, शौकत मनेर, दत्तात्रय नाईक, अनिता पठाडे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, दिलीप पठाडे, रमेश भिवशे, जत्राट ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवशे, अरुण निकाडे, अमर शिंत्रे, बाबुराव मगदूम, अरुण जाधव, इम्रान मकानदार, शिरीष कमते, चंद्रकांत मुधाळे, राहुल पाटील, अरुण निकाडे, निरंजन पाटील, सुरेखा घाळे, सचिन पोवार यांच्यासह निपाणी मतदारसंघातील ग्रामपंचायत पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *