बेळगाव : शहापूर येथील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे हे होते.
उपस्थित भागधारकांचे स्वागत संचालक श्री. प्रदीप ओऊळकर यांनी केले. बँकेचे कर्मचारी कै. सुनील पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बँकेचे जे सभासद, ठेवीदार व हितचिंतक मयत झाले आहेत त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
मागील वर्षाचे इतिवृत्त वाचन श्री. प्रवीण पाटील यांनी केले. 2020-21चा अहवाल, नफा विभागणी श्री. प्रदीप ओऊळकर यांनी मांडला. ताळेबंद वरिष्ठ लेखपाल श्री. परिंद जाधव यांनी मांडले. तसेच नफा तोटा पत्रक श्री. प्रताप जाधव आणि चालू वर्षाचे अंदाजपत्रक श्री. सागर हावळाण्णाचे तर लेखा परीक्षण व दुरुस्ती अहवाल श्री. संदीप मोरे यांनी मांडला. शेवटी बँक पोटनियम दुरुस्ती अहवाल व्यवस्थापक श्री. संकोच कुंदगोळकर यांनी सादर केला. या सर्व विषयावर चर्चा होऊन उपस्थित भागधारकांच्य वतीने सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. श्री. देवकुमार बिर्जे, श्री. शिवाजी तारीहाळकर, श्री. चिमण जाधव, श्री. संदीप मुतगेकर यांनी बँकेच्या सुधारणे विषयी प्रश्न विचारले असता चेअरमन आणि संचालक मंडळाने समर्पक उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले.
यावेळी व्हाईस चेअरमन श्री. विजय पाटील, श्री. राजेंद्र पवार, श्री. नारायण पाटील, श्री. अनंत जांगळे, श्री. मोहन कंग्राळकर, श्री. मदन बामणे, श्री. प्रवीण जाधव, श्री. संजय बाळेकुंद्री, सौ. वंदना धामणेकर, सौ. पल्लवी सरनोबत, श्री. महादेव सोंगाडी, श्री. सुनिल आनंदाचे यांच्यासह बहुसंख्य भागधारक उपस्थित होते.
शेवटी श्री. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.
Check Also
मराठा बँक पंचवार्षिक निवडणूक : चौघांची माघार; सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन
Spread the love बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक …