Thursday , December 26 2024
Breaking News

विधान परिषद निवडणुकीत राज्यात विक्रमी 99.8 टक्के मतदान

Spread the love

बंगळूर : कर्नाटकातील 20 विधान परिषद मतदारसंघातून 25 सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी 99.8 टक्के विक्रमी मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, 2015 च्या विधान परिषद निवडणुकीच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे.
कोलार मतदारसंघात सर्वाधिक 99.9 टक्के आणि विजापुर येथे सर्वात कमी 99.55 टक्के मतदान झाले असून जवळपास सर्वच निवडणूक मतदारसंघांमध्ये चांगले मतदान झाले. बंगळुर शहर जिल्ह्यामध्ये तब्बल 99.86 टक्के मतदान झाले असून 2,073 मतदारांपैकी 2,070 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय, काही जागांवर जिथे लढत चुरशीची होती, उमेदवारांनी स्वत: जवळजवळ सर्व मतदारांची खात्री करून घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 अशी वाढवण्यात आली असली तरी राज्यभरातील काही ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर दुपारी 12 वाजेपर्यंत 100 टक्के मतदान झाले. दक्षिण कन्नड, बिदर, उत्तरा कन्नड, रायचूर, बळ्ळारी, शिवमोगा, चिक्कमंगळूर, हसन, बेंगळूर ग्रामीण, बेंगळुरू अर्बन आणि कोडगु येथील निवडणूक जागांवर दुपारी 2 वाजेपर्यंत 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते आणि अखेरीस ते 99 टक्क्यांवर पोहोचले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि कौन्सिलमधील विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील संबंधित शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदसिद्ध सदस्य म्हणून मतदानाचा हक्क बजावणारे होते.
तथापि, बंगळुरमधील खासदार आणि आमदारांनी त्यांचे अधिकार गमावले आहेत. कारण बीबीएमपी संस्था अस्तित्वात नाही आणि ते पदसिद्ध सदस्यत्वाचा दावा करू शकत नाहीत.
मतदानाची उपलब्ध आकडेवारी
कोलार व चिक्कबळ्ळापूर – 99.9 टक्के, बळ्ळारी – 99.88 टक्के, बेळगाव – 99.97 टक्के, बंगळूर शहर – 99.86 टक्के, तुमकूर-99.78 टक्के, चिक्कमंगळूर – 99.71 टक्के, गुलबर्गा व यादगिरी – 99.75 टक्के, कोडगू – 99.70 टक्के, हासन – 99.77 टक्के, उत्तर कन्नड – 99.73 टक्के, विजापूर – 99.55 टक्के.

About Belgaum Varta

Check Also

‘डिजिटल अटक’ घोटाळ्यात ११.८ कोटीची फसवणूक

Spread the love  बंगळूरच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची तक्रार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू बंगळूर : एक ३९ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *