Sunday , December 22 2024
Breaking News

पाठबळ नसतानाही मतदारांमुळे जारकीहोळी विधानपरिषदेत : युवा नेते उत्तम पाटील

Spread the love

मतदारांसह कार्यकर्त्यांचे मानले आभार

निपाणी (वार्ता) : कोणत्याही वरिष्ठ नेतेमंडळींचे पाठबळ नसताना केवळ मतदार व कार्यकर्त्यांमुळेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जारकिहोळी हे विधानपरिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या वतीने मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भागात विकास साधणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
येथील संपर्क कार्यालयात बुधवारी (ता. 15) आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. उत्तम पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बी. एस. येडियुराप्पा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी कोणत्याही नेत्यांचे पाठबळ नव्हते. आपण, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व सहकार्‍यांनी गावानिहाय बैठका, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच स्वबळावर प्रचार यंत्रणा राबवली. त्याला निष्ठावंत कार्यकर्ते व मतदारांची साथ मिळाल्याने जारकीहोळी विजयी झाले.
निपाणी मतदारसंघावर जारकीहोळींचे विशेष लक्ष राहणार आहे. निपाणी परिसरातील डोंगर भागात प्रस्तावित पाणीयोजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. जारकीहोळी यांच्या सहकार्याने ही योजनाही लवकरच मार्गी लागणार आहे. त्यांच्या सहकार्याने निपाणी मतदारसंघातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बैठकीस नगरसेवक संजय सांगावकर, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, शिरीष कमते, निरंजन पाटील, अशोक माळी, गजानन कावडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
———-
स्वबळावर बोरगाव नगरपंचायत
गेल्या निवडणुकीतही बोरगावात स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी 17 पैकी 13 नगरसेवक निवडणून आणले होते. यंदा निवडणूक लागली आहे. नगरविकास पॅनलच्या माध्यमातून सर्व 17 जागांवर निवडणूक लढवली असून तेथील उमेदवारांना विजयी करणार आहोत. यापूर्वी आपण माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका लढविल्या. सध्या देखील माजी आमदार काकासाहेब पाटील हेच आपले नेते आहेत. यापुढे स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा विचार झाल्यास वरील नेतेमंडळींशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *