पोलीस खाते सुस्तच : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या चोर्यांबरोबर भुरट्या चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दोन दिवसात संभाजीनगर परिसरात पाच-सहा ठिकाणी चोर्या झाल्याचे प्रकार घडले.
यात कोणताच मोठा ऐवज लंपास झालेला नसला तरी त्यामुळे चोर्यांचे वाढलेले प्रमाण मात्र चिंताजनक ठरले आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन पोलिस प्रशासनाला तात्काळ सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
नवे, जुने संभाजीनगर परिसरात डॉ. एस. जी. सूर्यवंशी यांच्या दवाखान्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. हे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. तसेच बाळू घस्ते, गणेश धनवटे यांच्याही घरांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तसेच येथील अंगणवाडी क्र 355 मध्ये कुलूप तोडून चोरट्यांनी येथील गर्भवती महिलांचे तसेच लहान मुलांचे खाद्यपदार्थांचे किट, साखर, तेल लांबवले. दुसर्या दिवशी सकाळी कुलूप तुटल्याचे अंगणवाडी शिक्षिकांना दिसून आले. यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
शहर व उपनगरांमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले असताना पोलीस प्रशासनाने मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सोने चोरी गेलेल्या नागरीकांची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांना सोने खरेदी केलेल्या पावत्या तसेच एवढे सोने आले कोठून अशा प्रकारचे प्रश्न विचारून हैराण केले जात आहे. यातून चोरीची फिर्याद दाखल होणारच नाही व तपास करावा लागणारच नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.
वाढत्या चोर्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस प्रशासनातर्फे काही प्रमाणात रात्रीची गस्त घातली जात आहे. मात्र तीदेखील योग्य प्रकारे नसल्याच्या तक्रारी होत आहेत.
Check Also
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
Spread the love पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …