बेळगाव : येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये कोविड19 लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक मंगेश पवार यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी प्राध्यापक जी. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी आणि प्राचार्या ममता पवार उपस्थित होते. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गीता कांबळे, डॉक्टर योगेश कुंडेकर, हेल्थ इंस्पेक्टर रायान्ना डुमबन्नवर, डॉक्टर नसरीन कूरणी, डॉक्टर देविका फडते आणि आशा कार्यकर्त्या यांनी विशेष परिश्रम घेतले. लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …