बेळगाव : झारखंड राज्य कुस्ती संघटनेच्या वतीने 15 ते 17 डिसेंबर दरम्यान रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सरकारी सरदार्स हायस्कूलचा विद्यार्थी सागर चन्नाप्पा सनदी याने 75 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ पदक मिळविले आहे.
सध्या सरदार्स हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून युवा योजना सेवा खात्याच्या क्रीडा वसतीगृहात ए. के. आर. नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे. त्याला शाळेचे क्रीडा शिक्षक विठ्ठल कमती, एच. वाय. मास्तीहोळी, यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक एन. एम. मदनभावी यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Check Also
शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Spread the love बेळगाव : बेळगावातील आणि शहापूरमधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात …