बेळगाव : बेळगावचे स्केटिंगपटू अवनीश कामनावर आणि आराध्या पी. यांनी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या 59 व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवित पदक पटकाविले. 11 ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती.
या यशाबद्दल अवनीश कामनावर आणि आराध्या पी या स्केटिंगपटूंचा रेल्वे खात्याचे अधिकारी लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
स्केटिंगपटू अवनीश आणि आराध्या पी हे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करतात.