Saturday , December 21 2024
Breaking News

भाजपा महिला मोर्चा ग्रामांतर बेळगावतर्फे पंजाब काँग्रेसचा निषेध

Spread the love

बेळगाव (वार्ता) : पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. भाजप पक्षाने मागणी केल्याप्रमाणे गंभीर चुकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. दोषी आढळलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी करीत भाजपा महिला मोर्चा ग्रामांतर बेळगावतर्फे पंजाब काँग्रेसचा निषेध करण्यात आला.
चरणजीत चन्नी यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने समाजकंटकांना रीतसर पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिल्याने पंतप्रधान सुमारे 15 ते 20 मिनिटे रस्त्यावर अडकून पडल्याची घटना राज्याच्या आणि बहुधा देशाच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. चन्नी यांना रस्त्यावर मोकळेपणाने फिरण्याची व्यवस्था देण्यात आली आणि पंतप्रधानांना भटिंडा विमानतळाच्या दिशेने माघारी फिरावे लागले, हे जाणून बुजून करण्यात आले असून निषेधार्ह आहे, असे आरोप करण्यात आले आहेत.
तसेच क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी, राज्य सरकारने देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड केली आणि त्यांचा जीव धोक्यात टाकला. हे एक षडयंत्र म्हणावे लागेल, असा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेमागे कटाची शक्यता नाकारू शकत नाही आणि त्याची अगदी सूक्ष्म तपशिलापर्यंत चौकशी करणे आवश्यक आहे, राज्य सरकारने गुप्त हेतूने, जाणीवपूर्वक आणि गुन्हेगारीपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे.
आज पंजाब काँग्रेसच्या गैरकारभाराचा निषेध करत असताना बेळगाव येथील महिला मोर्चाच्या सदस्यांनाही अटक करण्यात आली. महामृत्युंजय जपसाठी काही सदस्या उपस्थित होत्या.
डॉ. सोनाली सरनोबत, भाग्यश्री कोकितकर आणि ग्रामीण महिला मोर्चाच्या सदस्यांनी चन्नम्मा सर्कल गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
मोदीजींच्या आरोग्यासाठी महादेव देवस्थानातही पुजार्‍यांकडून दररोज महामृत्युंजय जप केला जाणार आहे. डॉ. सोनाली यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या कुटील कारस्थनाचा निषेध केला. वाढत्या कोविड प्रकरणांमुळे सामाजिक अंतर ठेवून प्रार्थना करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण

Spread the love  येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *