बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
सध्याची वाढती थंडी लक्षात घेऊन शहरातील कपिलेश्वर मंदिर रेल्वे स्टेशन टिळक चौक आदी ठिकाणी या उपक्रमाद्वारे फेस मास्कसह 151 ब्लँकेट्स मोफत वाटण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, निरंजन अष्टेकर, परशराम काकतकर, पिराजी शिंदे, प्रकाश हेब्बाजी, विनायक जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Check Also
कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा पहिला दिवस
Spread the love बेळगाव : कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आज एकूण सात सादरीकरणाने …