Sunday , July 26 2026
Breaking News

अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा लांबणीवर!

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा उद्या रविवार दि. 5 रोजी होणार होता. पण जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मूर्ती अनावरण सोहळा लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले. मूर्ती अनावरण सोहळा सर्वांना सामावून घेऊन भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल असे जाहीर केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग आणि महापालिका उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी रात्री मूर्ती परिसराची पाहणी करून अर्धा तास लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती दिली. महापौर, उपमहापौर यांनी अनगोळ येथील मूर्ती चौथरा वास्तू पूजन केले असून रविवारी अनावरण होणार असल्याचे जाहीर केले होते. पण, पुतळ्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे अनावरण सोहळा लांबणीवर टाकावा, अशी मागणी करत अनगोळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. जिल्हाधिकारी रोशन यांनी आपण प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेवू, असे सांगितले होते. त्यानुसार रात्री अनगोळ येथे कामाची पाहणी केली. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत. शिष्टाचाराचे उल्लंघन होणार नाही आणि कार्यक्रम सर्वसमावेशक होण्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत. त्यामुळे रविवारी कोणीही मूर्तीकडे येऊ नये. घरातच थांबून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. बेळगाव हे शांतताप्रिय शहर आहे. त्यामुळे आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, उद्या कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्या गावची बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले आहे.

यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या चर्चेची माहिती दिली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी पाहणी केली असून लोकांच्या मागणीनुसार मूर्ती अनावरण कार्यक्रम भव्यदिव्य करण्यात येणार आहे.

या पाहणीवेळी म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर, उमेश कुर्‍याळकर, बी. ओ. येतोजी, विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, गावातील पंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अलतगा सरकारी मराठी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Spread the love  अलतगा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलतगा येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *