खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्थायीकमिटी अध्यक्षपदाची निवड नुकताच पार पडली.
यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी अध्यक्षस्थानी होते.
स्थायी कमिटीसाठी ११ नगरसेवकाची यादी नगराध्यक्षांच्याकडे देण्यात आली. यामध्ये नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांची कमिटी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर स्थायी समिती सदस्यपदी उपनगराध्यक्षा लक्ष्मी अकंलगी, नगरसेवक आपय्या कोडोळी, विनायक कलाल, विनोद पाटील, मिनाक्षी बैलूरकर, रफिक वारेमणी, नारायण मयेकर, राजश्री तोपिनकट्टी, जया भुतकी, सायरा सनदी आदीची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर यांची निवड होताच, मावळते स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार यांनी अध्यक्षाची सुत्रे नुतन अध्यक्ष प्रकाश बैलूरकर यांच्याकडे सुपूर्द करून त्यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले.
निवड होताच अध्यक्ष व सदस्यानी शिवस्मारकात जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालुन अभिवादन केले
तर प्रकाश बैलूरकर यांचाही नगरसेवकांनी पुष्पहार घालुन सत्कार केला.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …