खानापूर : गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृती ही प्राचीन असून यामध्ये स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. संस्कृती टिकविणे हे केवळ तिच्याच हातात आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सरिता पाटील यांनी केले.
गुंजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदा देसाई होत्या. तुळशी स्तोत्राने तुळशी पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुंजी ग्रामपंचायत सदस्य स्वाती गुरव यांच्याकडून उपस्थित सुवासिनींना हळदीकुंकू लावून तिळगुळ व वाण देण्यात आले. बालिकांनाही खाऊ वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्या बेळगावच्या रणरागिनी म्हणून ओळखला जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव पाटील यांनीही स्त्रीच्या समाजातील श्रेष्ठ कर्तृत्वाची जाणीव करून दिली. आई वडील हेच प्रथम गुरु आहेत. मुलगा-मुलगी समानतेची भावना दृढ करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्याच बरोबर समारंभाचे अध्यक्ष सुनंदा देसाई, ग्रामपंचायत सदस्य स्वाती गुरव, संध्या पालेकर यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी सुधा के. घाडी, कल्पना देसाई, संगीता गुरव, प्रणाली गुरव, यांच्यासह गुंजीतील महिला व बालिका उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गुंडू करंबेळकर यांनी तर जयकुमार यांनी आभार मानले.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …