बेळगाव : शिवसेनेच्यावतीने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना मंगळवारी अभिवादन करण्यात आले.
उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, तालुका संघटक तानाजी पावशे, राजू कणेरी, हेब्बाजी यासह अन्य शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते.
कोनवाळ गल्लीत अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना मंगळवारी कोनवाळ गल्ली येथे सिंहगर्जना युवक मंडळाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार दिगंबर पाटील, मनोहर हलगेकर, नेताजी जाधव, सरिता पाटील यासह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण राखत त्यांना अभिवादन करण्यात आले.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …