Saturday , July 27 2024
Breaking News

खासदार फंडातून निडगल गावच्या रस्त्याचा शुभारंभ

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडगल (ता. खानापूर) गावच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून निडगल गावला जोडणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन भाजप नेते शरद केशकामत यांनी केले.
यावेळी निडगल गावच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे निडगल गावाला रस्ता दुरूस्तीची नितांत गरज होती.
निडगल गावच्या रस्त्याचा शुभारंभ झाल्याने निडगल भागातील नागरिकांतून समाधान पसरले आहे.
यावेळी निडगल गावचे निवृत्त शिक्षक एम. पी. कदम, गणपत पाटील, परशराम कदम, सुरेश चोपडे, देवापा कदम, श्री. सुतार, ग्राम पंचायतीचे सदस्य आदी गावचे नागरिक उपस्थित होते.
त्याचबरोबर किशन चौधरी, परशराम गोरल, भरत गोरे, शांताराम मेलगे गर्लगुंजी आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून कामाचा शुभारंभ झाला.
कारवार लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्री. अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीमधून खानापूर तालुक्याचे भाजपा नेते श्री. शरद केशकामत यांच्या अथक परिश्रमातून खानापुर तालुक्यातील विविध पंचायतमध्ये विकासकामे आणली. या विकासकामांचा शुभारंभ आज बरगाव पंचायतमधील निडगल गावी येथील रस्त्याचे भूमिूपूजन करून करण्यात आले. यावेळी भाजपा नेते शरद केशकामत, किशन चौधरी, परशराम गोरल, भरत गोरे, शांताराम मेलगे, देवाप्पा कदम, सर्व पंचायत सदस्य तसेच इतर ग्रामस्थ मंडळी याठिकाणी उपस्थित होते. तसेच याच फंडातून जांबोटी भागातील आमटे पंचायत येथील कालमणी या ठिकाणी देखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा नेत्या धनश्री सरदेसाई, मिलिंद डांगे, मारुती गावकर, महादेव गावकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती. तसेच इटगी पंचायतमधील इटगी येथील शुभारंभ प्रसंगी महांतेश सानिको, प्रदीप सानिको, विठल किळोजी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मंडळी याठिकाणी उपस्थित होते.
या निधीसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व नेते मंडळींचे व उपस्थितांचे सर्व ग्रापंचायतकडून खूप खूप आभार.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *