पोलिस बंदोबस्त कायम
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता फक्त कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून प्रवेश मिळणार आहे.
कर्नाटक शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा भागातून स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोगनोळी येथील दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात होता.
महाराष्ट्रासह इतर राज्यातील कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना या ठिकाणी अडवून त्यांच्याकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तपासणी करुन सोडण्यात येत होते. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. कर्नाटक शासनाने आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्ती बंद केली आहे. कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून आता कर्नाटकात प्रवेश मिळणार आहे. यामुळे या ठिकाणी असणारा कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरील पोलिस बंदोबस्त कायम राहणार असल्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी दिली.
शनिवार तारीख 12 रोजी या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांच्या कडे कोरोना दोन डोस घेतलेल्या चा दाखला बघून सोडण्यात येत होते. यामुळे या ठिकाणी होणारी मोठी गर्दी कमी झाली होती.
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. आय. कंभार, सहायक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, राजू गोरखनावर, प्रकाश माने, दुंडाप्पा सनदी, आरोग्य सेविका विद्या पाटील, आशा कार्यकर्त्या मंगल माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …