Friday , April 18 2025
Breaking News

संकेश्वर यात्रेत सोन्याची चेन हिसकावून चोरटे फरार…

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेत युवानेते प्रकाश नेसरी यांच्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरांनी हिसकावून फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरी झालेल्या सोन्याच्या चेनची किंमत अदमासे २ लाख १९ हजार रुपये आहे. चोरीचा प्रकार यात्रेत उपस्थित लोकांच्या डोळ्यांदेखत घडला तरी चोरटे चलाखीने निसटले आहेत. याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रकाश नेसरी म्हणाले, शुक्रवार दि. ११ रोजी आपण श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेत सहभागी होऊन रथ लाकडी थरपने पुढे रेटतांना गर्दीचा फायदा उठवित चोरांनी आपल्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हातोहात लांबविली आहे. सदर सोन्याची चेन आपण मलबार गोल्डमधून वर्षभरापूर्वी खरेदी केली होती. यात्रेत रथ ओढताना भाविकांची मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा उठवित चोरांनी आपली चेन चोरली आहे. आपण संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांना चोरीची घटना घडल्याचे सांगितले आहे. जवळपास कोठेच सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरांंचा शोध घेणेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. चोरीची घटना घडली त्यावेळी अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते. चोरांनी हातचलाखींने चेन हिसकावून पोबार केला आहे. चोरीचा प्रकार लागलीच लक्षात आला तरी आपणाला कांहीच करता आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

हुक्केरी येथे १९ रोजी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण

Spread the love  हुक्केरी : शहरातील बेळगाव रोडवर असणाऱ्या हळदकेरी भागात येथे छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *