खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अबकारी खात्याकडून गोवाहून येणारी चोरटी दारू पकडण्यात खानापूर अबकारी खात्याचा नेहमीच हातखंडा आहे.
खानापूर तालुका हा गोवा राज्याच्या हद्दीला लागुन आहे. त्यामुळे गोव्यातुन कोणत्याही मार्गाने चोरटी दारू वाहतूक होत असेल तर खानापूर अबकारी खात्याकडून हमखास कारवाई होतेच.
अशाच प्रकारे शनिवारी दि. १९ रोजी खानापूर तालुक्यातील रामनगर अळणावर रोडवरील लिंगनमठ क्राॅसवर गोवा बनावट दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या खासगी आरामबसवर खानापूर अबकारी खात्याकडून कारवाई करून ५१८.५२ लिटर दारू साठा जप्त केला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी दि. १९ रोजी खानापूर तालुक्यातील रामनगर अळणावर रोडवरील लिंगनमठ क्राॅसवर खानापूर तालुका अबकारी खात्याकडून कारवाई केली.
याप्रकरणी वाहक तोराटी व्यंकटस्वामी मुर्देश्वरराव वय ४० रा. आंध्रप्रदेश याला आटक झाली. तर ड्रायव्हर पळून जाण्यात यशस्वी झाला.
यावेळी खानापूर तालुका अबकारी खात्याचे अबकारी निरीक्षक दावलसाब शिंदोगी आणि त्याच्या सहकारी वर्गाने शनिवारी ही कारवाई केली.
यात गोवा बनावटीची ५१८.५२ लिटर दारू जप्त केली.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …