Monday , December 4 2023

प्रत्येकानी शिवरायांचा आदर्श जोपासावा

Spread the love
मंत्री शशिकला जोल्ले : शिवजयंती उत्साहात साजरी निपाणी (वार्ता) : शहरात शनिवारी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकातील पुतळ्यास मंत्री शशिकला जोल्ले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व जाती धर्मातील नागरिकांना त्यांनी आपल्या काळात समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. सॅमसंग आदर्श सर्वांनी जोपासावा असे मत शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्यक्रमास गोपाळ नाईक, संतोष सांगावकर, रवी कदम, दत्ता जोत्रे, रवी घोडके, राहुल भाटले, माजी सभापती सद्दाम नगारजी, उदय नाईक, सुनील शेलार, पिंटू माने,उदय शिंदे, अनिल खाडे, बाळासाहेब जोरापुरे, विजय टवळे, पिंटू माने, बाबासाहेब घोडके, सुनील राऊत, विश्‍वनाथ जाधव, गणू गोसावी यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
रामनगरमध्ये शिवजयंती
येथील रामनगर येथे फ्रेंड्स क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले.
यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा उद्योजक रोहन साळवे, निकू पाटील, अरुण आवळेकर, भालचंद्र पारळे, विनोद बळारी, बाळासाहेब कम यांच्यासह फ्रेंड्स क्लबचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *