डॉ. आनंद पाटील : कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार वितरण
निपाणी (वार्ता) : भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. विविध प्रकारची पिके घेण्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकयांची भूमिका महत्वाची आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून या शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगती मध्ये हातभार लावला आहे. त्यामुळे प्रत्येक बळीराजाचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे मत स्टडी सर्कलचे प्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च इंस्ट, मुंबई यांच्यावतीने कुर्ली येथे दिवंगत बाळाराम आबा पाटील शेतकरी गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यावेळी त अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
युवराज पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकरी पुरस्कार वितरणाचे स्वरूप सांगितले. याप्रसंगी वैशाली पाटील, सावित्रीबाई पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्षी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी कृष्णात रामचंद्र चव्हाण, साताप्पा पुंडलीक पाटील, अशोक धोंडीराम प्रताप, महादेव शंकर शिंदे, पांडूरंग जोती माने यांना सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास रविंद चौगुले, वैशाली पाटील, अमोल माळी, प्रल्हाद प्रताप, नानीबाई पाटील, दत्ता पाटील, आण्णासो माळी, सुनिल प्रताप, विक्रम पाटील, विजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सुत्रसंचालन
केले. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.