अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्ट होत आहेत. आम आदम पार्टीने दिल्ली पाठोपाठ पंजाबचा गड जिंकला आहे. येथे तब्बल 89 मतदारसंघांमध्ये आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेस आणि अकाली दलाचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर पडले आहेत.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. पटियाला मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे.
दिग्गज नेते पिछाडीवर आहेत मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे भदौड आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू, मोहालीमध्ये बलबीर सिंग सिद्धू, जालालाबदमध्ये सुखबीर बादल हेही पिछाडीवर पडले आहेत.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …