संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ आवारात जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते. मठ गल्ली आणि नदी गल्लीतील महिलांनी जागतिक महिला दिन कष्टकरी महिलांच्या सन्मानाने साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा कुलकर्णी उपस्थित होत्या. येथील महिला दिन कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांना गौरविण्यात आले. विधवा तसेच शेतकरी, कष्टकरी महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी म्हणाल्या, महिलांमध्ये एकजूट निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महिला एकसंघ झाल्या की त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडू शकते. अरुणा कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. नगरसेविका सौ. श्रीविद्या बांबरे म्हणाल्या, मठ गल्लीतील महिला दिन कार्यक्रम महिलांना एकजूट करण्यात निश्चितच उपयुक्त ठरल्याचे सांगितले. कार्यक्रमात महिलांसाठी लिंबू-चमचा स्पर्धा घेण्यात आली. उपस्थितांचे स्वागत सौ. श्रावणी जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्वती शिंदे, लता माने यांनी केले. कार्यक्रमाला लता सुतार, सुनिता केंपदानी, लक्ष्मी कदम, हमीद शेख, सुजाता कागिलकर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार चोपदार मॅडम यांनी मानले.