Sunday , July 26 2026
Breaking News

कुस्ती वस्ताद व प्रसिद्ध पैलवान काशिराम पाटील यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील रहिवासी, प्रसिद्ध पैलवान कुस्ती वस्ताद काशिराम कल्लाप्पा पाटील (वय 54) यांचे अल्पशा आजाराने आज (दि. 26 रोजी) निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात 22 वर्षे देशसेवा व कुस्ती कोच म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी सैन्य दलातून तसेच खुल्या कुस्ती आखाड्यातून अनेक कुस्त्या जिंकून बेळगाव व कर्नाटकाचा लौकिक वाढवला होता. त्यांनी विना मोबदला वस्ताद म्हणून सेवा करत असतांना कंग्राळी व परिसरातून अनेक मल्ल घडवले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, बहीण असा मोठा परिवार आहे. जुन्या पिढीतील प्रसिद्ध पैलवान कल्लापा पाटील यांचे ते पुत्र होते तर माजी ग्रा. पं. अध्यक्षा रुक्मिणी निलजकर यांचे भाऊ होत. अंत्यविधी शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *