यूपीमध्ये पुन्हा योगी राज; जाणून घ्या एका क्लिक वर नवीन मंत्र्यांची यादी
लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली आहे. दोघेही उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. योगींच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. (पाहा योगींच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी–
मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ
केशव प्रसाद मौर्य – उपमुख्यमंत्री
ब्रजेश पाठक – उपमुख्यमंत्री
मंत्री :सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, अशीष पटेल, संजय निषाद
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) :नितिन अग्रवाल, कपिल देव अग्रवाल, रवींद्र जायसवाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीचंद्र यादव, धर्मवीर प्रजापति, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालु
राज्यमंत्री :मयंकेश्वर सिंह, दिनेश खटीक, संजीव गोंड, बलदेव सिंह ओलख, अजीत पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान वाल्मीकि, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौर गुरू, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निरीक्षक म्हणून आलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावर सर्व आमदारांनी सहमती दर्शवली.
तसेच, नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255 जागा मिळाल्या, तर त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. पूर्ण बहुमताचे सरकार बनवणार असल्याचा विश्वास योगींनी व्यक्त केला होता. 37 वर्षांपूर्वी, 1985 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले होते. तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. योगी आदित्यनाथ यांच्या खात्यात तब्बल 37 वर्षांनंतर हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.