खानापूर : मोठ्या संख्येने मराठा समाज असलेल्या खानापूर तालुक्यात वधू-वर सूचक मंडळाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे, असे मनोगत बेळगाव येथील मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी व्यक्त केले.
खानापूर येथील बुरूड गल्लीतील सातेरी पाटील यांच्या एस. माऊली इमारतीत सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन श्री.पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश निलजकर होते. मराठा समाज मोठा असल्याने लग्न ठरविताना अनेक अडचणी येतात त्यांना वधू-वर मंडळाची मोठी मदत होते. याबाबत मराठा समाज सुधारणा मंडळाचे कायम सहकार्य राहिल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी देऊन मंडळाला शुभेच्छा दिल्या.
एप्रिल महिन्यात शिवस्मारक येथे वधू-वर मेळावा घेण्यात येणार असून मंडळाच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नांव नोंदणी करता येईल.
यावेळी बी. बी.पाटील (करंबळ), अँड. अनंत देसाई (झुंझवाड), पुंडलिक पाटील (करंबळ), डॉ. एस. डी. पाटील (कुप्पटगिरी), बी. ए. पाटील (चापगाव), तुळजाराम गुरव, एम. आर. पाटील, शिरीष जाधव (इदलहोंड), उमेश बुवाजी (कुप्पटगिरी), विठ्ठल अडकूरकर, जगदीश कुंभार आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन भालचंद्र पाटील यांनी केले तर आभार नारायण गुरव यांनी मांडले.
एप्रिल महिन्यात पहिला मेळावा होईल.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …