Tuesday , September 17 2024
Breaking News

प्रोत्साह फाउंडेशन आयोजित समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

बेळगाव – बेळगावातील प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी महांतेश नगर येथील महंत भवनात समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातील वधू-वरांनी संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
रोपाला पाणी घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. हरळय्या समाज प्रमुख शिवानंद मब्रुमकर, बेळगावचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमन्नी, चंद्रकांत लोकरे, सुरेश सांगली, डॉक्टर चंद्रकांत वाघमारे, मल्लिकार्जुन ताळीकोटी, उद्योजक हिरालाल चव्हाण, सागर कित्तूर, सागर कोळेकर, शंकर कांबळे, रवी होनगल, प्रोत्साह फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी यांसह संतोष होनगल, शिवराज सौदागर आदी मान्यवर मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवानंद मब्रुमकर म्हणाले, समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी समाजाने संघटितरित्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. वधू-वर मेळावा काळाची गरज असून, जनहिताचे कार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य मान्यवरांनीही यावेळी आपले समयोचित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मल्लिकार्जुन ताळीकोटी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्राध्यापक चंद्रकांत वाघमारे यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना पुस्तकांची भेट अर्पण केली. अशोक हन्नीकेरी यांनी प्रास्ताविक केले. सागर कित्तूर यांनी आभार मानले. उत्साह फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर मेळाव्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल, तीन राज्यातून उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *