Saturday , October 19 2024
Breaking News

सकल मराठा समाजातील प्रमुखांनी घेतली कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची भेट

Spread the love

गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात केली चर्चा

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांच्या सानिध्यात येत्या 15 मे 2022 रोजी बेळगाव येथे भव्य गुरुवंदना समारंभ होणार आहे.
त्याअनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी कलादिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांची एन. डी. स्टुडिओमध्ये भेट घेऊन श्री. किरण जाधव यांनी त्यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने सत्कार केला. दरम्यान, नितीन देसाई यांनी संपूर्ण गुरुवंदना समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंचासंदर्भात चर्चा केली. तसेच बेळगाव परिसरातील मराठा समाजातील नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सकल मराठा समाजाचे योगी बिरादार, सागर पाटील, अक्षय साळवी, चेतन नंदगडकर, विशाल कंग्राळकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *