Sunday , July 26 2026
Breaking News

माणगांव येथे रायगड प्रेस क्लबचा 16 वा वर्धापन दिन व बक्षीस वितरण समारंभ

Spread the love


माणगांव (नरेश पाटील) : सन 2006 पासून रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास नेहमी अग्रेसर राहिलेल्या त्याच बरोबर सर्व सामान्यांसाठी सतत बांधिलकी जपणारी व जनतेच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध असणारी संघटना “रायगड प्रेस क्लब” चा 16 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान वितरणाचा सोहळा माणगांव नगरीत उद्या शुक्रवारी सकाळी 11:00 वाजता निजामपूर रोड कुणबी भवन येथे सदर संघटनेचे संस्थापक तथा मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्थ असलेल्या नामांकित व्यक्तिमत्व एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अदितीताई तटकरे, खा. सुनील तटकरे, विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण ढरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, ज्येष्ठ माध्यमकर्मी समीरण वाळवेकर, विस्वस्थ मराठी पत्रकार परिषदचे किरणजी नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्ठीवकर, सचिव, कोकण विभागाचे विजय मोकल, रायगड विभाग अध्यक्ष भारत रांजणकर आणि रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप उपस्थित राहणार आहे.
यादरम्यन कार्यक्रमाचे औचित्यसाधून राज्यातील काही दिगज्ज पत्रकार तसेच रायगड जिल्ह्यातील इतर विविध क्षेत्रात मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल भाजप ता. अध्यक्ष संजय अप्पा दवळे, माणगांव श्रीवर्धन विधानसभा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, ता.तळा तसेच माणगांवचे मेडिको अध्यक्ष तथा नामांकित अल्फा हॉस्पिटल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे डॉ. इस्माईल राहटविलकर तसेच पत्रकार हरेश मोरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक माणगांव ता. प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संतोष सुतारजीसह पदाधिकारी व सदस्य यांनी यशस्वी करण्यासाठी गेली दोन आठवड्यापासून जोरदार तयारी करीत आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love  पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *