कोगनोळी : लोकराजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दी दिनाच्या निमित्ताने वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
स्वागत प्रास्ताविक आर. आर. कुऱ्हाडे यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक रविकिरण नवाळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक जातीधर्मातील बारा बलुतेदार यांना एकत्रित आणून सर्व धर्म समभाव असा नारा दिला होता. छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याने त्यांना दूरदृष्टीचा राजा, लोक राजा, महामानव, रयतेचा राजा म्हणून लोक आदराने पूजतात. त्यांच्यासारखा राजा पुन्हा जन्मास येणे नाही. आज जे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने गावा गावांमध्ये राहत आहेत. त्यामध्ये शाहू महाराज यांचे मोलाचे कार्य आहे. लहानपणापासूनच सर्व विद्यार्थ्यांना शाहू महाराज व सर्व महामानवांचे कार्य सांगून त्यांच्या जीवना मध्ये प्रेरित करावे. त्यांच्या जीवनामध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल.
यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थिनी यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी एस. एन. अलगुरे, आर. आर. कुऱ्हाडे, कोरडे, वैशाली चिंचणे, शोभा वडर, सुनिता वडर व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …