Saturday , October 19 2024
Breaking News

प्रभाग 13 चा समझोता फिसकटला; दुरंगी सामना होणार..

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग क्रमांक 13 करिता भाजपाने समझोतासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण काँग्रेसने चाणाक्षपणाने प्रस्ताव फेटाळून निवडणुकीला सामोरे जाणेच इष्ट समजल्याने प्रभाग 13 ची दुरंगी लढत होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी समझोत्याचे प्रयत्न झाले.
हुक्केरीचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी काँग्रेसपुढे शासननियुक्त नगरसेवकपद देणेचा प्रस्ताव ठेवला होता. तो काँग्रेसने फेटाळून लावल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज छाननीनंतर पाच जण निवडणूक रिंगणात राहिले होते. आज तिघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस विरोधात भाजप असा सरळ दुरंगी सामना होत आहे.
शासननियुक्त नगरसेवकाची ऑफर
प्रभाग क्रमांक 13 चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. दु:खद घटनेत निवडणूक नको. याकरिता खुद्द मंत्री उमेश कत्ती यांनी समझोता घडवून आणण्याचे कार्य केले. मंत्रीमहोदयांनी प्रभाग 13 ची जागा भाजपाला सोडून द्या. काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. प्रविण नेसरी यांना शासननियुक्त नगरसेवकपद बहाल करण्याचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेस नेते प्रभाग 13 ची जागा काँग्रेसची असल्यामुळे ती काँग्रेसला सोडून देण्याच्या मुद्यावर ठाम राहिल्याने समझोता होऊ शकला नाही. निवडणूक रिंगणातून भाजपाचे उमेदवार रोहण नेसरी, प्रविण नष्टी यांनी माघार घेऊन शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांना आखाड्यात उतरविले आहे. निजदचे शिवानंद लक्ष्मण समकण्णावर यांनी स्वेच्छेने माघार घेतल्याने प्रभाग 13 ची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड प्रविण एस. नेसरी विरोधात भाजपाचे शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्यात होत आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेनंतर येथे निवडणूक नको समझोता घडवून आणण्यासाठी मंत्री उमेश कत्ती, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, पवन कणगली, सभापती सुनिल पर्वतराव, शासननियुक्त नगरसेवक रोहण नेसरी, काँग्रेसचे बसनगौडा पाटील, दिलीप होसमनी, अविनाश नलवडे, नगरसेवक जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, कुमार कब्बूरी यांनी प्रयत्न केले. पण समझोता होऊ शकला नाही. त्यामुळे निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.
निजदची स्वेच्छेने माघार
निवडणूक रिंगणातील निधर्मी जनता दलाचे उमेदवार शिवानंद एल. समकण्णावर यांनी स्वेच्छेने माघार घेतली आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शिवानंद समकण्णावर म्हणाले निवडणूक लढण्यासाठी आखाड्यात उतरलो होतो. पण संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेचा विचार करता निवडणूक लढविणे आपणाला योग्य वाटले नाही. याकरिता आपण स्वेच्छेने माघार घेतली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *