खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न
खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले आहे. मराठा हा दु:खी पिडीत असह्य असलेल्यासाठी काम करणारा खरा क्षत्रिय आहे. मराठा समाज शास्त्रीयदृष्ट्या मर्यादित राहणार राहणारा आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील नेत्याना प्रोत्साहन द्यावे लागले. त्याचबरोबर नेत्यांनाही समाज्याच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे बेंगळूर गोसामी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामीजींनी बोलताना व्यक्त केले.
व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे प्रमुख सुरेश साठे, राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगीरी, हंडीभडगनाथ महाराज पिरशेरनाथ मोहननाथजी, क्षत्रिय मराठा परिषदेचे राज्याध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार व्यंकटराव चव्हाण, हिंदूस्थान श्रीराम संघटनेचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर, डॉ. सोनाली सरनोबत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, शंकर बाबली महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात शिवाजी महाराज प्रतिमेचे पुजन करून उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी कॅप्टन चांगापा पाटील, पिटर डिसोजा, हेस्काॅमच्या कल्पना तिरवीर आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरील सुरेश साठे, रमाकांत कोंडुस्कर, डॉ. सोनाली सरनोबत, भगवान गीरी, आदिंनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला श्रीसाई कृष्ण प्रतिष्ठानचे संस्थापक के. पी. पाटील, वसंत देसाई, किरण येळ्ळूरकर, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, नारायण ओगले आदी नेते मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, ऍड. ईश्वर घाडी, हणमंत गुरव, बबन दळवी, सचिव रमेश पाटील, एस. एन. बेडरे, किरण येळ्ळूरकर, संघटनेचे पदाधिकारी आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल चिगुळकर यांनी केले.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …