बेळगाव : एससीएसटी समाजाला वाढीव आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती जमाती आरक्षण वाढ आंदोलक क्रिया समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले होते.
येत्या 15 दिवसात वाढीव आरक्षण न मिल्यास सरकार पडेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. एससीएसटी समाजाला 3 टक्के आरक्षण देण्यात येत आहे. हे आरक्षण 7.5 टक्के इतके करण्यात यावे, या मागणीसाठी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे अनियमित काळासाठी धरणे आंदोलन सुरु आहे. प्रसन्नानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 100 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती जमाती आरक्षण वाढ आंदोलक क्रिया समितीच्यावतीने विविध दलित वाल्मिकी संघटनांच्या विद्यमाने आंदोलन छेडण्यात आले होते.
यासंदर्भात वाल्मिकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार म्हणाले, प्रसन्नानंद स्वामींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून महिना उलटला तरी शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. आपल्या मागण्या मान्य होत नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता आपल्या समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण मिळणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. हि भीक नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा हक्क दिला असून येत्या 15 दिवसात आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही तर बोम्मई सरकार कोसळेल, असा इशारा त्यांनी दिला.
वाल्मिकी समाजाचे नेते यल्लाप्पा कोलकार यांनी सांगितले, आपण कायदेशीर लढाईनुसार आपली मागणी सरकारसमोर मांडत आहोत. देशातील 31 राज्यांचा अभ्यास करून निवृत्त न्यायमूर्ती एच. एन. नागमोहनदास यांनी सरकारला अहवाल सादर केला आहे. महाराष्ट्रात देखील आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. आरक्षण वाढीसाठी प्रसन्नानंद स्वामी धरणे आंदोलन करत असून या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु या आंदोलनाच्या ठिकाणी कोणीही भेट दिली नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात महादेव तळवार, सुरेश गवन्नवर, महेश शिगीहळ्ळी, आनंद शिरूर आदींसह कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती, जमाती आरक्षण आंदोलक क्रिया समिती, दलित, वाल्मिकी संघटनांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
मराठा बँकेच्या चाव्या सत्ताधारी गटाकडे; एका जागेवर अपक्ष विजयी
Spread the love बेळगाव : संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत …