निपाणी (वार्ता) : कारदगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्ष पदी राजू खिचडे तर उपाध्यक्षपदी मंगल डांगे यांची निवड झाली आहे. काल मित्र बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तर युवा नेते उत्तम पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या नंतर युवा नेते उत्तम पाटील यांनी कारदगा ग्रामपंचायतीचे नूतन अधक्ष राजू खिचडे व उपाध्यक्ष मंगल डांगे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळीग्रामपंचायत सदस्य निवदूत धनगर, विनोद ढेंगे, किरण टाकळे, राहुल रत्नाकर, स्वाती कांबळे, सुजाता वड्डर, पद्मश्री अलंकार, बाळव्वा दळवाई, वीरश्री खिचडे, किरण सुभाष ढेंगे, राशिदा पटेल, सुदीप उगळे, ताबरेज अत्तार, संजय गावडे, विजय कचरे, महेश देसाई, धोंडिबा काशीद, सुभाष ढकाणे सम्राट पसारे, रणजित पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थि होते.