चेअरमन सचिन खोत : विद्यार्थ्यांचा सत्कार
कोगनोळी : गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तगुरु संस्थेतर्फे मदत केली जाईल. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे आहे पण परिस्थितीमुळे घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मदत करून उच्चशिक्षित बनवू. संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम जोपासण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन चेअरमन सचिन खोत यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित कोगनोळी यांच्यावतीने दहावी परीक्षेमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे संचालक जगन्नाथ खोत यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात दत्तगुरु संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी कोगनोळी हायस्कूलचे विद्यार्थी साक्षी बाळासाहेब कागले प्रथम क्रमांक, सलोनी अप्पासाहेब पाटील द्वितीय क्रमांक, सिद्धीका जगन्नाथ खोत तृतीय क्रमांक यांचा तर हालसिद्धनाथ शिक्षण समूह येथे शिवानी दत्तात्रय गोरडे प्रथम क्रमांक, सोनाली दिनकर माने द्वितीय क्रमांक, दीक्षा बाळासो कांबळे तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन डॉक्टर महादेव मिरजे, उदय मोनाप, बाबासाहेब दिवटे, व्यवस्थापक विदुला हेगडे, बाळासो कांबळे, दिनकर माने, गौराबाई गोरडे, अन्नपूर्णा साखरे, सविता कांबळे, राजकुमार खोत, कल्लेश माळी, विजय खोत, सौरभ पाटील, सतीश घुगरे, अभिजीत धने, अनुप हेगडे, दीपक नवाळे, नमिता कोळेकर, शाहरुख नाईकवाडे, धनाजी शिंदे, सुशांत पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक, बँक कर्मचारी उपस्थित होते.
जनरल मॅनेजर विद्यासागर बाळिकाई यांनी आभार मानले.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …