बेळगाव : संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणार्या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकार्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी परिसर. संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी सेवा वाजविणार्या स्वच्छता कर्मचार्यांच्या निवासी भागातच पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आझम नगर येथील पी. के. क्वाटर्स परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता कामगार राहतात. या परिसरात रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पथदीप यासह अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच या परिसरात साप, मुंगूस आणि इतर किड्यांचाही प्रादुर्भाव वाढला असून या भीतीपोटी मुलांनाही बाहेर पाठविणे मुश्किल बनले आहे.
Check Also
बिम्समध्ये आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू…
Spread the love बेळगाव : बेळगावच्या बिम्समध्ये रविवारी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच …