एम. बी. जिरली यांची टीका
बेळगाव : कारगिल युद्धानंतर भारताच्या तिन्ही सेनादलाच्या विशेष समितीने सैन्य भरती संदर्भात चिंतन करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. सैन्यदलाच्या विशेष समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देशातील तरुणांना सैन्यात सेवेची भरती मिळावी यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. मात्र याच चांगल्या योजनेला अग्निकुंड बनविण्याचे काम विरोधकांनी केल्याचा टीका, भाजप प्रवक्ते अॅड. एम. बी.जिरली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत पुढे बोलताना जिरली म्हणाले, सैन्यदलाच्या समितीच्या शिफारशीनुसार अग्निपथ योजनेची अंमलबजावणी होत आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर अग्निपथ योजनेत काम केलेल्या अग्नीवीरांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात युवकांची शिस्तबद्ध फौज निर्माण होणार आहे. अग्निपथ कार्यकाळात अग्नीवीरांना चांगले वेतन निर्माण मिळणार आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना भविष्य निर्वाह निधी दिला जाणार आहे. अशा चांगल्या योजनेची विरोधकांनी अवहेलना चालू केली आहे. त्यामुळे युवकात संभ्रम निर्माण झाला आहे. देशातील युवकांनी अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती करून घ्यावी. त्याच बरोबर सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिरली यांनी केले.
दरम्यान अग्निपथ योजनेवरून संपूर्ण देशात उग्र आंदोलन सुरू झाले आहे. तरुणांच्या मनात केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भात तीव्र असंतोष उफाळून आला आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचे जिरली यांनी टाळले. आमदार बेनके यांनीही सदर योजना सैन्य दलाने बनविली आहे. यावर अधिक बोलणे उचित होणार नाही असे सांगून वेळ मारून नेली.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …