Wednesday , October 23 2024
Breaking News

हलशीवाडी येथे खानापूर समितीची मोर्चाबाबत जनजागृती

Spread the love

खानापूर : मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी रस्तावर उतरण्याची तयारी सर्वांनी करावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांनी केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २७ जुन रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत गुरुवारी हलशीवाडी, हलगा, हलशी आदी गावांमध्ये जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ देसाई होते. यावेळी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी १९८६ मध्ये कन्नड सक्ती आंदोलन करण्यात आले होते. तेंव्हापासून सातत्याने मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी समितीतर्फे आवाज उठवला जात आहे. मात्र अजूनही इतक्या मराठी भाषिकांना त्यांचे हक्क दिले जात नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली असून सोमवारी काढण्यात येणारा मोर्चा भव्य आणि दिव्य ठरणार आहे. त्याबाबत प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत असून सोमवारी हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती दिली.
युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी समितीच्या पाठीशी युवा वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक गावात मोर्चाला चांगला पाठींबा मिळत आहे. त्यामुळे मोर्चात युवा वर्ग अधिक प्रमाणात दिसून येईल असे मत व्यक्त केले.
रघुनाथ देसाई, राजु पाटील, मिलिंद देसाई, राजाराम देसाई आदींनी मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
बैठकीला वामन देसाई, पुंडलिक देसाई, विनोद देसाई, सयाजी देसाई, तानाजी सुतार, लक्ष्मण देसाई, प्रकाश देसाई, परशराम देसाई, रमेश देसाई यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

“मातृभाषा शाळा अभियान” संदर्भात सर्व भाषिकांची 27 रोजी एकत्रित बैठकीचे आयोजन

Spread the love  खानापूर : तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *