खानापूर : गर्लगुंजी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत बरगाव सीआरसी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ध्वजारोहनाने करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गर्लगुंजी मराठी मुलांची शालेचे सहशिक्षक श्री. संतोष चोपडे यांनी केले. चोपडे यांनी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रतिज्ञा दिली.
यावेळी ग्राम पंचायतीचे पंचायत विकास अधिकारी श्री. जोतिबा कामकर तसेच सर्व पंचायत सदस्य आणि शाळा सुधारणा समिती व केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
मुलांच्या सांघिक खेळात खो-खो स्पर्धेत मराठी मुलांची शाळा गर्लगुंजी संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद सरकारी मराठी मुलांची शाळा तोपिनकट्टी संघाने मिळविले.
कब्बडी स्पर्धेत मराठी मुलांची शाळा गर्लगुंजी संघाने विजेतेपद मिळविले तर कुप्पटगिरी सरकारी शाळेच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
मुलींच्या सांघिक खेळात मराठी मुलींच्या शाळेने खो-खो मध्ये विजेतेपद पटकाविले तर बिदरभावी संघाने उपविजेतेपद पटकाविले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …