बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव डिस्ट्रिक्ट 317 यांच्यातर्फे आज शुक्रवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम येळ्ळूर येथे उत्साहात पार पडला.
इनरव्हील वर्षाच्या शुभारंभाचे प्रतिक म्हणून इनरव्हील क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष शालिनी चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कन्नावर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी येळ्ळूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इव्हेंट चेअरमन सुरेखा देशपांडे आणि को -चेअरमन श्रुतिका बागी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात इनरव्हीलच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता. सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत विविध जातींच्या झाडांची 317 रोपटी लावण्यात आली. या वनमहोत्सवाबरोबरच डॉक्टर्स डे निमित्त इनरव्हील क्लबतर्फे पशुवैद्य डॉ. कासार यांचा प्राण्यांच्या समर्पित सेवेबद्दल सत्कार करण्यात आला होता.